गर्भधारणेचे टप्पे

गर्भधारणेचा ७वा महिना – लक्षणे, शारीरिक बदल आणि काळजी

गर्भधारणेच्या २८व्या आठवड्यात किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक सरणाऱ्या दिवसासोबत अस्वस्थता जाणवेल. ह्या काळातील अजून एक विशेष भावना म्हणजे तुम्हाला जवळच्या प्रिय व्यक्तींकडून खूप काळजी आणि प्रेम मिळेल. आता डोहाळेजेवणासारख्या विशेष समारंभाचा आनंद घेण्याची वेळ आहे आणि ह्या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक मौल्यवान क्षण जपून ठेवण्याची ही वेळ आहे.

गर्भधारणेच्या ७व्या महिन्यात सामान्यपणे आढळणारी लक्षणे

बऱ्याच गर्भवती स्त्रियांमध्ये आढळणारी सामान्य लक्षणे म्हणजे

७व्या महिन्यात तुमच्या शरीरात कोणते बदल होतात?

गर्भारपणाच्या ७व्या महिन्यात जसजसे तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होत असते तसतसे तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात.

गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यात सामान्यपणे आढळणाऱ्या समस्या

तुमच्या शरीरात वर सांगितलेले बदल होतातच परंतु तुम्हाला खालील समस्या सुद्धा येऊ शकतात:

गर्भारपणाच्या ७व्या महिन्यात बाळाचा विकास

तुमच्या बाळाची दिवसागणिक वाढ होत आहे आणि ते मोठे होत असल्याचे बघून तुम्हाला आनंद होईल.

महिन्यांचे गर्भवती असताना काय करावे आणि काय करू नये

तुम्ही तिसऱ्या तिमाहीच्या जवळ असताना तुम्हाला तुमच्या आहाराच्या आणि इतर बाबतीत जास्त जागरूक राहावे लागते. व्या महिन्यात घ्यायच्या काळजीबाबतची यादी खाली दिली आहे. हे करा
  1. नियमित चालायला जा. मध्येच थोडी विश्रान्ती घेऊन लहान अंतर चालणे हे तब्येतीसाठी चांगले असते. एकाच जागेवर खूप वेळ बसणे टाळा. तुमचे शरीर जितके सक्रिय आणि लवचिक असेल तितके चांगले.
  2. छंद जोपासा. त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि आरामदायक वाटेल. तुमच्या मनावर नको असलेला ताण आणि विचार घेऊ नका. छंद म्हणजे पुस्तक वाचणे, झाडांना पाणी घालणे, पेंटिंग आणि गाणे म्हणणे ह्यापैकी कुठलाही असू शकतो. त्यामुळे तुम्ही शांत रहाल, तसेच लक्ष एकाग्र होईल.
  3. मेडिटेशन आणि श्वासाचे व्यायाम करा. त्यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही आरामदायक रहाल. दिवसातील १०-१५ मिनिटे एका लयीत श्वास घ्या.
  4. गर्भधारणेदरम्यान नियमित व्यायाम केल्याने तुम्ही सक्रिय राहून तुमची तब्येत चांगली राहील. तसेच प्रसूतीनंतर तुम्ही लवकर रिकव्हर व्हाल. तुमच्या ट्रेनरने शिकवलेले बेसिक स्ट्रेचेस नियमित करा.
  5. लोह समृद्ध अन्नपदार्थ खा उदा: अंडी, फळे, सीरिअल्स, हिरव्या पालेभाज्या, लाल मांस तसेच व्हिटॅमिन सी. डॉक्टरांनी दिलेल्या पूरक औषधांबरोबरच लोहाचे हे नैसर्गिक स्रोत हे महत्वाचे आहेत.
  6. नियमित रक्ताच्या चाचणीनुसार तुमच्या हिमोग्लोबिन च्या पातळीवर लक्ष ठेवा. विशेषकरून ज्यांचा रक्तगट नेगेटिव्ह आहे त्यांनी रक्ताच्या चाचणीच्या निकालावर लक्ष दिले पाहिजे.
हे करू नका
  1. तुमच्या बाळासाठी तुमची झोपण्याची योग्य स्थिती ही अतिशय महत्वाची आहे. डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या मूत्रपिंडाचे आणि यकृताचे कार्य नियमित राहील.
  2. धूम्रपान आणि अल्कोहोल घेणे टाळा. तसेच तुम्ही धूम्रपान करणाऱ्यांच्या सानिध्यात नाही ना ह्याची खात्री करा कारण धूर जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास ते हानिकारक ठरू शकते.
  3. ७व्या महिन्यानंतर तुम्ही वाकू शकणार नाही तसेच जास्त खाली मान घालून बसू नका. कायम शरीराची स्थिती योग्य ठेवा.
  4. काळजी घ्या आणि आतापासून वजन उचलणे टाळा. जड वस्तू उचलण्याचे काम आता काही महिन्यांसाठी तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडे द्या.

अन्नपदार्थ

गर्भधारणेच्या ७व्या महिन्याच्या आहार खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सूचना काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत. ह्या काळात तुमच्या बाळाची दृष्टी विकसित होते असते त्यामुळे तुम्ही ओमेगा फॅटी ऍसिड्स घेतले पाहिजेत. ह्यामुळे तुमच्या बाळाच्या वाढीची प्रक्रिया वाढेल. तुम्ही मासे, अंडी आणि समुद्री मासे खाऊ शकता, ते ओमेगा फॅटी ऍसिड्स चे समृद्ध स्रोत आहेत. तसेच, लोह आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध फळे आणि भाज्या खा. ह्या काळात लोह घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही मासे, अंडी आणि सी - फूड खाऊ शकता आणि ते ओमेगा फॅटी ऍसिड्स चे समृद्ध स्रोत आहेत. तसेच, व्हिटॅमिन सी आणि लोहाने समृद्ध फळे आणि भाज्या खा. लोहाचे योग्य प्रमाण हे अतिशय गरजेचे आहे. तुम्ही पालक, मांस, अंडी वगैरेंचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे ज्यामध्ये लोहाचा नैसर्गिक स्रोत असतो.

गर्भारपणाच्या सातव्या महिन्यात घ्यावयाची काळजी

तिसऱ्या तिमाही साठी काही टिप्स इथे देत आहोत:
  1. गर्भारपणात संप्रेरकांमधील बदलांमुळे काही वेळा मनःस्थितील बदलांमुळे भावनिक होणे किंवा चिंता वाटणे हे नॉर्मल आहे. जर तुम्ही पहिल्यांदा गरोदर असाल तर मन शांत राहणे कठीण आहे. आरामदायक राहण्याचा प्रयत्न करा आणि तिसऱ्या तिमाहीत उग्र भावनांसाठी तयार रहा.
  2. प्रसूती विषयी आणि बाळाच्या जन्माविषयी वाचा. तुम्हाला त्याविषयी जास्त माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही प्रसूती साठी तयार व्हाल.
  3. आठवड्याच्या शेवटी सुट्टी घ्या, तुमच्या पतीबरोबर जवळच्या रिसॉर्ट वर जा त्यामुळे तुम्हाला स्पेशल वाटेल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल.
  4. तुमच्या चिंता आणि भीती विषयी तुमच्या साथीदारासोबत बोला. त्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुमचा त्यांच्याबरोबरच बंध भक्कम होईल. तसेच, ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतील.
  5. बाळाच्या आगमनाची तयारी करा. बाळाची खोली चांगली सजवा कारण ते बाळ लवकरच तुमच्या कुटुंबाचा एक भाग होणार आहे. असामान्य नावे शोधा. तुम्ही दोघे काही पॅरेंटिंग सेमिनार्सना सुद्धा जाऊ शकता.
  6. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ही वेळ बाळंतपणाच्या रजेची आहे. ऑफिसच्या ताणातून थोडा ब्रेक घ्या आणि घरात आराम करा आणि तुमच्या कुटूंबाच्या सोबत रहा.

डॉक्टरांच्या दवाखान्यात काय अपेक्षित आहे?

जर तुम्हाला काही मोठे प्रश्न आणि समस्या नसतील तर आता इथून पुढे तुम्हाला महिन्यातून वेळा डॉक्टरांकडे जावे लागणार आहे. प्रत्येक चेकअप च्या वेळी तुमचे वजन आणि उंची तपासली जाईल. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या सूचना तुम्ही पाळत आहात ना ह्याकडे लक्ष द्या. आर. एच. नेगेटिव्ह मातांना सातव्या महिन्यात आर. एच. इम्यून ग्लोबीन सातव्या महिन्यात दिले जाते. आईच्या अँटीबॉडीज पासून संरक्षण होण्यासाठी ते दिले जाते. ह्या महिन्यात पोटातील बाळाच्या विकास जाणून घेण्यासाठी आणि जन्माच्या वेळेला काही दोष येऊ नयेत म्हणून होणाऱ्या आईला सोनोग्राफी करून घ्यावी लागते. जर तुम्ही खालील परिस्थिती अनुभवत असाल तर तुम्ही डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. अफाट आनंद, उत्कंठा आणि भावनिक संवेदना तुम्हाला तिसऱ्या तिमाहीमध्ये अनुभवण्यास मिळतील. वर दिलेल्या टिप्स पाळा आणि आनंदी, आरामदायक स्थितीत रहा. सकारात्मकता आणि आनंद हा आनंदी पालकत्वाची गुरुकिल्ली आहे. गोंडस बाळाच्या आगमनासाठी स्वतःला तयार करा!
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved