गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: ७वा आठवडा

७ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची तुमच्या पोटात वेगाने वाढ होत असते. परंतु तुमच्या पोटाच्या आकाराकडे पाहून तसे वाटत नाही. ह्या काळात तुमच्या शरीरामध्ये महत्वाचे बदल होत असतात, कारण तुमचे शरीर बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सज्ज होत असते. बऱ्याच स्त्रियांना ह्या आठवड्यात आपण आई होणार आहोत हे समजलेले असते. ह्या आठवड्यात तुमच्या वजनात वाढ झालेली नसते. तुम्हाला मॉर्निंग सिकनेस जाणवू लागतो.

गर्भधारणेच्या ७व्या आठवड्यातील तुमचे बाळ

ह्या आठवड्यात बाळाचे हात आणि पाय ह्यांचा विकास होऊ लागतो. भ्रूणाला एक छोटी शेपटी दिसू लागते आणि पुढे ती माकडहाडामध्ये विकसित होते. बाळाचा आकार मागच्या आठवड्यापेक्षा दुप्पट झालेला असतो. तुमच्या बाळाचा वेगाने विकास होत असतो, बाळाच्या मेंदूचे दोन भाग विकसित होत असतात. बाळाचे छोटेसे यकृत, अस्थिमज्जा (Bone Marrow) तयार होईपर्यंत तांबड्या पेशी तयार करण्याचे कार्य करत रहाते. पचनक्रियेत सक्रिय सहभाग असलेले अवयव जसे की स्वादुपिंड आणि अपेंडिक्स तयार होण्यास सुरुवात होते. आता तुमच्या बाळाला तुम्ही 'भ्रूण' म्हणू शकता.

बाळाचा आकार केवढा असतो?

तुमचे बाळ आता ब्लूबेरी च्या आकाराएवढे असते. ७ व्या आठवड्यातील बाळ हे १/४ इंच एवढे असते. गर्भधारणा झाल्यापासून ते ह्या आठवड्यापर्यंत तुमच्या बाळाचा लक्षणीय विकास झालेला असतो, म्हणजेच जवळ जवळ १०,००० पट. आता मेंदूच्या पेशींची वाढ होऊ लागते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणात तुमच्या शरीरात बदल घडत असतात आणि तुम्हाला ७ व्या आठवड्यात खालील बदल जाणवू लागतील.

७ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

७ व्या आठवड्यात कुठलेही शारीरिक बदल दिसणार नाहीत परंतु तुम्हाला ह्या आठवड्यात खालील लक्षणे दिसतील.

गर्भधारणेच्या ७व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात तुम्ही गरोदर आहात हे कळत नाही परंतु तुमच्या शरीरात खूप बदल होतील. ७व्या आठवड्यात तुमचे बाळ खूप छोटंसं असतं त्यामुळे पोटाच्या आकारावरून तुम्ही गरोदर आहात हे समजत नाही. बऱ्याच आई होणाऱ्या स्त्रियांचे पोट दुसऱ्या तिमाहीच्या मध्यावर दिसू लागते. परंतु तुम्हाला जुळे होणार असतील तर मात्र थोडे आधीपासूनच तुमचे पोट दिसू लागेल.

गर्भधारणेच्या ७व्या आठवड्यातील सोनोग्राफी

७ व्या आठवड्यात तुम्ही पहिली सोनोग्राफी करण्यास तयार असलात तरी बरेचसे डॉक्टर्स ८ व्या ते १० व्या आठवड्यापर्यंत वाट बघायला सांगू शकतात. हे मुख्यतः तुमचा वैद्यकीय इतिहास आणि तुमचे डॉक्टर्स काय सांगतात ह्यावर अवलंबून असते, डॉक्टर्सना बाळाच्या शरीराची वेगवेगळी मापे घेण्यास मदत होते, आणि त्यामुळे बाळाचा विकास कसा होतो आहे हे समजण्यास मदत होते. जरी तुमचे बाळ अल्ट्रासाऊंड मध्ये खूप छोटे दिसत असले तरी ते भ्रूण एका मिनिटात १०० मेंदूच्या पेशी तयार करीत असते. भ्रूणाचे मेंदू, ह्रदय, मूत्रपिंड आणि हात पाय विकसित होत असतात. तुम्हाला तुमच्या लघवीचे, रक्ताचे आणि गर्भाशयाच्या पेशींचे काही नमुने वेगवेगळ्या तपासणी साठी द्यावे लागतील. जुळे आणि तिळे असलेल्या मातांमध्ये hCG ची पातळी जास्त वाढलेली दिसते, आणि त्यामुळे जास्त मॉर्निंग सिकनेस जाणवतो.

आहार कसा असावा?

गर्भारपणात आरोग्यपूर्ण पोषक आणि चौरस आहार घेणे हे फार महत्वाचे असते. तुमच्या गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात तुम्ही खालील अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

मॉर्निग सिकनेस आणि मळमळ ह्यामुळे तुमच्या तब्ब्येतीवर परिणाम होतो. खालील काही टिप्सची तुम्हाला मदत होऊ शकते.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमची ७व्या आठवड्यातील खरेदीची यादी खालीलप्रमाणे: गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. गर्भधारणेपासून तुमच्या गर्भाशयाच्या आकार दुप्पट झालेला असतो. तुम्हाला मळमळ, थकवा आणि आळस जाणवेल. तुम्हाला जराही अस्वस्थता आणि वेगळं काही जाणवलं तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मागील आठवडा: गर्भधारणा: ६वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: ८वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved