गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: ४२वा आठवडा

जर तुम्ही ४२ आठवड्यांच्या गरोदर असाल तर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यात आहात. आता तुम्हाला बाळाची वाट बघणे असह्य झाले असेल. गर्भारपणाच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये आनंद, थोडी भीती आणि चिंता ह्यासारख्या संमिश्र भावना तुमच्या मनात असतील. हो ना? लवकरच तुमचं बाळ ह्या जगात येणार असून तुम्ही बाळाच्या मऊ हातापायांना स्पर्श करणार आहात. पण आता ४२व्या आठवड्यात तुमच्या पोटात असणारं तुमचं बाळ कसे दिसत असेल? चला बघूयात!

गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यातील तुमचे बाळ

आता तुमचे बाळ साधारणपणे कलिंगडाच्या आकाराचे झाले आहे. जरी तुमच्या बाळाचा अजून बाहेरच्या जगात प्रवेश झालेला नसला तरी सुद्धा ते तुमच्या पोटात सुरक्षित आहे आणि बाळाचा सतत विकास होत आहे! प्रत्येक बाळ हे वेगळं असतं आणि होणारी आईसुद्धा. त्यामुळे बाह्यघटकांमुळे तुम्ही बाळाच्या जन्माविषयी अजिबात चिंता करू नका. बऱ्याच वेळा पाळी चुकल्याची तारीख नीट लक्षात न राहिल्यामुळे किंवा ओव्यूलेशन उशिरा झाल्या कारणाने प्रसूती दिनांक काढण्यात चूक होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या प्रसूतीस उशीर झाला असे वाटू शकते.

बाळाचा आकार केवढा असतो?

४२व्या आठवड्यात बाळाचे वजन हे २.५ ते ३ किलो इतके असते आणि लांबीही २० इंच इतकी असते. अजूनही बाळाची वाढ होतंच राहणार आहे.  तुमच्या बाळाचा पोटातच अजूनही राहण्याचा विचार असल्याने आता डॉक्टर्स प्रसूती प्रेरित करतील. त्यामुळे जरी तुमचं बाळ बाहेर येण्यास थोडा उशीर असेल तरी सुद्धा काही दिवसातच तुमचं बाळ तुमच्याजवळ असणार आहे.

गर्भधारणेच्या ४२व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यात तुमच्या पोटाची त्वचा खूप ताणली गेली आहे. तुमचे बाळ आता संपूर्णतः विकसित झाले आहे त्यामुळे तुमचे गर्भाशय पूर्ण क्षमतेपर्यंत ताणले गेले आहे आणि त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार गोलाकार झाला आहे.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या ४२वा आठवडा म्हणजे प्रचंड थकवा आणि कठीण सुद्धा! आता तुम्ही तुमच्या प्रसूतीच्या अगदी जवळ आहात त्यामुळे तुम्हाला चिंता वाटणे अगदी साहजिक आहे. तुम्हाला खूप थकवा जाणवेल आणि कुठलंही साधं काम करताना तुम्हाला ते आव्हान वाटेल. आता तुम्हाला शरीरावरची सूज, गॅसेस मुळे पोट फुगणे आणि सराव कळा ह्या सगळ्याची सवय झाली असेल. पण तुम्ही सकारात्मक विचार केलात तर तुम्ही प्रसूतीच्या अगदीच जवळ पोहोचला आहात आणि काही मिनिटांमध्ये तुमचं बाळ ह्या जगात येणार आहे.

४२व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

४२ आठवडे म्हणजे तुम्ही ९ महिने आणि २ आठवड्यांच्या गरोदर आहात. हो, हे खूप जास्त दिवस आहेत पण हे खरं आहे. आतापर्यंत तुम्हाला गर्भारपणाच्या लक्षणांची पूर्ण ओळख झाली असेल. आतापर्यंत तुम्ही अनुभवलेली सगळी लक्षणे ४२व्या आठवड्यात सुद्धा तुम्ही अनुभवणार आहात. उदा: झोप न लागणे, पायांमध्ये पेटके येणे, पाठ दुखी, ओटीपोटात दुखणे, वारंवार लघवीला जावे लागणे इत्यादी. तथापि आता कळा खूप तीव्र असतील. अंगावर सूज सुद्धा असेल. तुम्हाला खूप अशक्त वाटू शकेल तसेच थकवा जाणवेल. रोजची छोटी कामे केल्याने सुद्धा तुम्हाला थकवा जाणवेल, परंतु काळजीचे काही कारण नाही कारण तुमचे बाळ जेव्हा ह्या जगात येईल तेव्हा हे सगळे त्रास नाहीसे होणार आहेत. आता तुम्ही प्रसूतीच्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवे कारण तुम्हाला आता कुठल्याही क्षणी हॉस्पिटल मध्ये जावे लागेल.

गर्भधारणेच्या ४२व्या आठवड्यातील सोनोग्राफी

आता तुम्ही सोनोग्राफी केल्यास ती खूप रोमांचक असेल कारण तुम्हाला संपूर्णपणे वाढ आणि विकास झालेले तुमचे बाळ दिसणार आहे. आता तुमच्या बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे आणि बाळाचे सगळे अवयव कार्यरत आहेत. गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यात, बाळाची फुप्फुसे परिपक्व झाली असून बाळ आता बाहेरच्या जगात स्वतःचे स्वतः जगण्यासाठी तयार आहे. बाळाची त्वचा थोडी कोरडी असेल कारण बाळाच्या त्वचेवरचे आवरण (Vernix caseosa) आता गळून पडले आहे. गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यात असलेल्या धोक्यांमुळे तुमचे डॉक्टर्स बाळावर बारीक लक्ष ठेवतील.

प्रसूतीची लक्षणे कुठली आहेत?

प्रसूतीच्या आधी सामान्यपणे आढळणारी लक्षणे, जी कदाचित तुम्ही अनुभवत असाल ती खालीलप्रमाणे,

१. कळा

आतापर्यंत तुम्हाला सराव कळा आणि खऱ्या कळांमधील फरक लक्षात आला असेल. त्यामुळे आता जर तुम्हाला कळा येत असतील तर तुमच्या प्रसूती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि जर हे  तुमचे दुसरे बाळंतपण असेल तर एक आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या पहिल्या प्रसूतीपेक्षा ह्यावेळी तुम्हाला ही प्रक्रिया सोपी जाणार आहे आणि प्रसूती सुद्धा लवकर होणार आहे.

२. गर्भजल पिशवी फुटणे

जर तुमची गर्भजल पिशवी फुटली तर गर्भजलाचा एकदम प्रवाह बाहेर येतो, अशावेळी लगेच तुमच्या डॉक्टरांना फोन करा. तुमची प्रसूती काही तासांमध्ये सुरु होणार आहे.

३. चिकट स्त्राव

जर थोडेसे रक्त असलेला घट्ट चिकट स्त्राव योनीमार्गातून येत असेल तर ते प्रसुती सुरु होण्याचे लक्षण असू शकते! ह्याचा अर्थ प्रसूतीसाठी तुमचे गर्भाशयाचे तोंड तयार होत आहे.

४२व्या आठवड्यात प्रसूती प्रवृत्त करणे

जर तुमचे गर्भारपणाच्या ४२ आठवडे भरले असतील तर तुमचे डॉक्टर्स खालील मार्गांनी प्रसूती प्रेरित करू शकतात.

१. गर्भजल पिशवी फोडणे

प्लास्टिकच्या हुक प्रमाणे दिसणाऱ्या उपकरणाने तुमचे डॉक्टर्स गर्भजल पिशवी फोडतील. त्यामुळे प्रसूती कळा सुरु होतील.

२. औषधांच्या सहाय्याने गर्भाशयाचे मुख उघडणे

प्रोस्टाग्लान्डिन नावाच्या औषधाची गोळी योनीमार्गात रात्रभर ठेवली जाते आणि त्यामुळे गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते.

३. कळा उत्तेजित करणे

सलाईनद्वारे, सिन्थेटिक ऑक्सिटोसिन दिले जाते, त्यामुळे काही तासातच कळा सुरु होतात.

४. गर्भजल पिशवीचे आवरण बाजूला करणे

प्रसूती प्रेरित होण्यासाठी डॉक्टर्स हे तंत्र वापरतात आणि त्यामुळे ४८ तासात प्रसूतीस सुरुवात होते. डॉक्टर्स बोटे घालून गर्भजल पिशवीचे आवरण बाजूला करतात त्यामुळे ऑक्सिटोसिन ह्या संप्रेरकाची निर्मिती होते आणि त्यामुळे ४८ तासात प्रसूतीस सुरवात होते.

आहार कसा असावा?

तुम्ही आरोग्यपूर्ण आहार घेत आहात तसेच पोषक अन्नपदार्थ खात आहात ह्याची खात्री करा त्यामुळे बद्धकोष्ठता होणार नाही. ह्या काळात अननस खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामध्ये ब्रोमेलाईन नावाचा घटक असतो त्यामुळे संयोजी ऊतक (connective tissue) मऊ होण्यास मदत होते. साल्मोन हा DHA चा एक उत्तम स्रोत आहे, ते खाल्ल्याने तुमच्या स्तनपानातील DHA ची पातळी वाढते. तसेच जंक फूड खाणे टाळा, त्याऐवजी ताजी फळे जसे की सफरचंद, किवी वगैरे खा.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भारपणाच्या ४२ व्या आठवड्यात काय काळजी घ्यावी ह्याची यादी

हे करा

हे करू नका

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. घरी असतानाच गर्भजल पिशवी फुटण्यासाठी मदत होईल असा अन्य काही मार्ग आहे का?

तुम्ही गर्भारपणाच्या ४२व्या आठवड्यामध्ये आहात आणि प्रसूतीची कुठलीही लक्षणे नसल्याने तुम्हाला काळजी वाटणे अगदी साहजिक आहे. परंतु तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा अवलंब करू नका. नैसर्गिक पद्धतींमध्ये शारीरिक संबंध ठेवणे, दूर अंतरापर्यंत चालणे तसेच वेगवेगळे व्यायाम प्रकार (squats आणि lunges) इत्यादींचा समावेश होतो.

२. स्तनाग्रे चोळल्याने प्रसूतीस सुरवात होईल का?

नैसर्गिकरित्या प्रसूती प्रेरित करण्यासाठी स्तनाग्रे चोळणे ही पद्धती उत्तम आहे. तुम्ही तुमच्या अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने स्तनाग्रांना मालिश करू शकता. त्यामुळे ऑक्सिटोसिन तयार होते आणि गर्भाशय संकुचित होण्यास मदत होते. परंतु ह्या पद्धतींविषयी वेगवेगळी मते आहेत आणि त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते किंवा आई आणि बाळासाठी त्या हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे कृपया आपल्या डॉक्टरांशी आधी संपर्क साधा त्यामुळे सगळे सुरळीत होईल. संशोधनाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, प्रसूती तारीख उलटून गेल्यानंतर ८०% बाळांचा जन्म होतो, आणि ह्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रसूतीचा दिनांक काढण्यात चूक झालेली असते. त्यामुळे अजूनही बाळाचा जन्म कसा झाला नाही ह्या विचाराने घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही त्याऐवजी आता बाळाच्या स्वागताच्या तयारीला लागा! मागील आठवडा: गर्भधारणा: ४१वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved