गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: १५वा आठवडा

गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात तुम्ही पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, आणि तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी झाला आहे तसेच विशिष्ट वास आणि अन्नपदार्थांचा तिटकारा सुद्धा आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे. गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला खूप उत्साही वाटेल तसेच तुमची कामेच्छा जागृत होईल आणि त्यामुळे तुमच्या बाळाला कुठलीही हानी पोहोचणार नाही.

गर्भारपणाच्या १५व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमचे  बाळ आता मोसंबी किंवा सफरचंदाएवढ आहे. १५व्या आठवड्यात बाळाच्या भुवया, केस, त्वचा ह्यांचा  विकास होण्यास सुरुवात होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाळाचा हाडांचा सांगाडा नीट तयार होण्यास सुरुवात होईल, जो आतापर्यंत कूर्चेच्या स्वरूपात होता. बाळ आता संपूर्ण विकसित  मनुष्यासारखे दिसू लागेल. डोक्याच्या दोन्ही बाजूला कान  आणि चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी डोळे विकसित होतील. तुमच्या बाळाच्या पोटातील हालचाल तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे तसेच तुमचे बाळ गिळणे, चोखणे आणि श्वास घेणे ह्या क्रिया सुद्धा करत आहे.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात तुमचे बाळ जेमतेम सफरचंदाएवढे मोठे आहे, तुमच्या बाळाचा आकार  ३-४ इंच इतका आहे आणि  वजन ५०-६० ग्रॅम्स इतके असेल. तथापि बाळाचे सगळे अवयव दिवसागणिक योग्यरीतीने विकसित होत आहेत त्यामुळे  तुम्ही निश्चिन्त राहू शकता. थोडक्यात १५व्या आठवड्यापासून तुमच्या बाळाचा वेगाने विकास होत असून ह्या नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी तुमचे शरीर अखंड कार्यरत आहे.

शरीरात होणारे बदल

१५ व्या आठवड्यात तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये बदल होत आहेत आणि तुमच्याही शरीरात गर्भारपणादरम्यान योग्य बदल होणे हे अतिशय सामान्य आहे. तुमच्या शरीरात आतापर्यंत झालेल्या बदलांव्यतिरिक्त तुमच्या शरीरात खाली नमूद केलेले बदल होऊ शकतात.

१५व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भधारणेपासून आत्तापर्यंत तुम्ही नवीन लक्षणांचा अनुभव घेत आहात, आणि गर्भारपणाचा १५ वा आठवडा सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यातील काही लक्षणे खाली दिली आहे.

गर्भधारणेच्या १५व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमच्यापैकी बऱ्याच जणींचे पोट आता दिसू लागेल आणि विशेषतः ज्यांची ही दुसरी वेळ आहे त्यांच्या बाबतीत ही शक्यता जास्त आहे. पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या स्त्रियांमध्ये पोट न दिसण्याची शक्यता असू शकते. गर्भारपणाचा १५ वा आठवडा हा दुसऱ्या तिमाहीत आणि एकूणच गर्भारपणात संक्रमणाचा काळ आहे. १५ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय ताणले जाते.

गर्भधारणेच्या १५व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या आठवड्यातील सोनोग्राफीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमचे बाळ हात पाय ताणत आहे. आता तुमच्या बाळाचे सांधे नीट विकसित झाले आहेत, त्यामुळे तुमचे बाळ तुमच्या पोटात खूप चुळबुळ करेल. बाळाच्या ह्या क्रियांमुळे तुम्हाला पोटात गुदगुल्या झाल्यासारखे जाणवेल आणि पोटात बुडबुडे असल्याची संवेदना होईल तसेच बाळाला उचक्या सुद्धा लागतील.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात ज्या ज्या गोष्टींची गोष्टींची काळजी असते त्यातील महत्वाचा विषय म्हणजे आहार कसा असावा. तुमच्या पोटात तुमचे बाळ वाढत आहे आणि बाळाला योग्य रीतीने पोषण मिळावे म्हणून तुम्हाला योग्य आहार कोणता घ्यावा म्हणून ताण येऊ शकतो. खाली एक यादी दिली आहे त्यामध्ये काय खावे हे सुचवलेले आहे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

आता आपण स्वत: ला तसेच आपल्या बाळाला सुरक्षित ठेवत आहात आणि निरोगी बाळाला जन्म देण्यासाठी योग्य जीवनशैली निवडणे काही अवघड नाही.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

जेव्हा बाळाची चाहूल लागते तेव्हा तुमची खरेदीची यादी खूप मोठी असते. परंतु आपल्याला खरोखरीच कुठल्या गोष्टीची गरज असते ते पाहूया, गर्भारपणात सकारात्मक रहा, त्याविषयी सगळी माहिती जवळ ठेवा. त्यामुळे तुम्ही आई होण्याच्या ह्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकाल. मागील आठवडा: गर्भधारणा: १४वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: १६वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved